मुंबई:  आयपीएल रंगात आली असतानाच आता टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण म्हणजे 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) शिखर परिषदेच्या बैठकीत हा प्रमुख निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिषदेनं क्रिकेट हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू असली तरी त्यासाठी सुरुवातीला BCCI तयार नव्हते. मात्र आता जर क्रिकेट हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यात आला तर त्यासाठी आता महिला आणि पुरूष दोन्ही भारतीय संघाची क्रिकेट टीम ऑलिंपिकसाठी पाठवण्यात येणार आहे.


ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय क्रिडा संघटनेंतर्गत येतात. या सर्व संघांना IOAच्या छत्राखाली कामं करावी लागतात. त्यांच्यानुसार सर्व गोष्टी होत असतात. आयओए आणि भारत सरकार अंतर्गत BCCIचा काम करण्यास नकार आहे. BCCIने तसं स्पष्टपणे सांगितलं आहे. जर आम्हाला स्वयत्तता असेल आणि तसं लेखी लिहून दिलं जाणार असेल तरच आम्ही दोन्ही संघ ऑलिंपिकमध्ये खेळण्यासाठी उतरवू अशी भूमिका BCCIने आधीच स्पष्ट केली आहे.