मुंबई : BCCI लवकरच खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करणार आहे. गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या पगारावर कात्री बसणार असल्याची चिन्ह आहेत. दोन्ही खेळाडू सध्या ए श्रेणीमध्ये आहेत. तर या दोन्ही खेळाडूंचा ग्रेड-बीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी न्यूजच्या वेबसाइटनुसार, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा ग्रेड-B मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल या खेळाडूंना यावर्षी प्रमोशन मिळू शकतं. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेशिवाय इशांत शर्मालाही ग्रेड-ए मधून ग्रेड-बीमध्ये जावं लागण्याची शक्यता आहे.


बीसीसीआयचा वार्षिक करार ग्रेड-ए प्लस, ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी अशा चार श्रेणींमध्ये विभागलेला असतो. यामध्ये खेळाडूला अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि एक कोटी रुपये इतकं मानधन मिळतं.


चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सध्या केवळ टेस्ट क्रिकेट खेळतात. तसंच गेल्या दोन वर्षांपासून या दोघांचा फॉर्म फारच खराब असल्यामुळे प्लेइंग-11 मध्ये दोघांच्या जागेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. या दोघांचाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात समावेश होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


सध्या अक्षर पटेल, मोहम्मद सिराज हे खेळाडूंचा ग्रेड-सीमध्ये समावेश आहे. मात्र या खेळाडूंचा आता ग्रेड-बीमध्ये समावेश केला जाणार आहे. तर दुसरीकडे उमेश यादवला ग्रेड-बी मधून ग्रेड-सीमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं आणि शार्दुल ठाकूर आता ग्रेड-बीचा भाग असू शकतो.


सध्या विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्या नावांचं ग्रेड ए प्लसमध्ये समावेश आहे. ऋषभ पंत आणि केएल राहुलचा A+ श्रेणीत समावेश होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.