मुंबई : T20 वर्ल्डकपला आज खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. यावेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही संघासोबत मेंटॉर म्हणून जोडला गेला आहे. पण या दरम्यान टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना यूएईमधून पुन्हा मायदेशी बोलावलं आहे.


हे खेळाडू भारतात परतले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 वर्ल्डकपच्या मध्यावर भारताने चार नेट गोलंदाजांना माघारी पाठवलं. कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौतम आणि व्यंकटेश अय्यर अशी या गोलंदाजांची नावं आहेत. 


बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, “एकदा स्पर्धा सुरू झाल्यावर इतकी नेट सत्रं होणार नाहीत. सय्यद मुश्ताक अली करंडक खेळून या गोलंदाजांना सामन्यांचा सराव मिळेल."


भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानविरुद्ध टी -20 वर्ल्डकप सामन्याआधी पर्यायी सराव सत्रात भाग घेतला. ज्यामध्ये मेंटॉर महेंद्रसिंग धोनीने थ्रोडाउन स्पेशालिस्टची भूमिका बजावली. यावेळी हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे आता प्लेइंग 11च्या निवडीसाठी पंड्याची गोलंदाजी हा पेचप्रसंग कायम आहे.


सुपर -12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने


  • 24 ऑक्टोबर- भारत विरूद्ध पाकिस्तान

  • 31 ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूजीलंड

  • 3 नोव्हेंबर- भारत विरूद्ध अफगानिस्तान

  • 5 नोव्हेंबर- भारत विरूद्ध स्कॉटलंड

  • 8 नोव्हेंबर- भारत विरूद्ध नामीबिया