मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहरने 1 जून रोजी जया भारद्वाजसोबत लग्न केले. दीपकच्या लग्नाला अनेक मोठे क्रिकेटपटू उपस्थित होते, पण टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने मात्र त्याच्या लग्नाला हजेरी लावली नाही. तर के.एल राहुल बहरीनकडून खेळलेल्या त्याच्या, क्रिकेटर मित्राच्या लग्नाला त्याने हजेरी लावली. के.एल राहुलने या लग्नातील फोटो शेअर करताच लोकांमध्ये चर्चा सुरु झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलने बहरीनमध्ये त्याचा मित्र डेव्हिड कीलन मॅथियासच्या लग्नाला हजेरी लावली होती. याचे अनेक फोटो त्यांने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये राहुलने कुर्ता पायजमा घातला आहे. फिरंगीच्या लग्नात राहुलनं केलेल्या या देसी लूकची खूपच चर्चा होत आहे.


राहुलने आपले फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भावाचे लग्न'. डेव्हिड मॅथियासने त्याची गर्लफ्रेंड कल्याणी देसाईशी लग्न केलं आहे.


डेव्हिडचा जन्म भारतात झाला आणि तो कर्नाटककडून क्रिकेट खेळला आहे. तेव्हा केएल राहुल त्याच्यासोबत होता, त्यामुळेच दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे. केएल राहुलच्या फोटोवर अथिया शेट्टीनेही कमेंट केली आहे.



डेव्हिड मॅथियासने 2022 साली बहरीनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने चार सामन्यांत 119 धावा केल्या. त्याच वेळी, या 31 वर्षीय फलंदाजाने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले, परंतु भारतात त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. या कारणास्तव तो बहारीनकडे वळला.


दीपक चहरच्या लग्नाला हजर राहिले नव्हते


दीपक चहरने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला आयपीएल मॅचदरम्यान प्रपोज केले होते. प्रदीर्घ नात्यानंतर 1 जून रोजी दोघांनी लग्न केले. जया भारद्वाज ही दिल्लीची रहिवासी आहेत. दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. त्याचवेळी दुखापतीमुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. तर चेन्नई सुपर किंग्जने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये आपल्यासोबत जोडले होते.