`तो` मोठा निर्णय घेणार विराटलाच ठाऊक होतं... मिठीचा फोटो व्हायरल
Ashwin And Virat Hug : पाचव्या दिवशी जेव्हा पावसामुळे मॅच थांबली तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळाच नजारा दिसला. यावेळी विराट आणि अश्विन एकमेकांना मिठी मारताना दिसले.
Virat Kohli Hugging Ashiwn Viral pic: गाबा टेस्ट मॅच ड्रा होण्यानंतर भारतीय स्पीनर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. फिरकीच्या जादूगरने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 106 सामने खेळले असून एकूण 537 विकेट घेतले आहेत. गाबा टेस्ट मॅच दरम्यान विराट कोहली भारतीय ड्रेसिंग रुममध्ये अश्विनला मिठी मारताना दिसला. अश्विन कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वीच विराटला हा निर्णय सांगितल्याच म्हणण्यात येत आहे.
त्याचवेळी हा क्षण पाहून चाहत्यांनी अंदाज वर्तवला की, अश्विन इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा करत आहे. गाबा टेस्ट मॅच दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. ज्यामध्ये कोहली अश्विनला मिठी मारत आहे. पाचव्या दिवशी पावसामुळे सामना थांबला. त्याचवेळी ड्रेसिंग रुममध्ये हा क्षण पाहायला मिळाला.
विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये भारतीय फिरकीपटू अश्विनला मिठी मारताना दिसत आहे. हे पाहून अश्विन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावणार आहे की काय असा अंदाज लोक बांधू लागले. खरं तर, ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांना मिठी मारल्यानंतर कोहली आणि अश्विन बराच वेळ बोलताना दिसले. कोहली आणि अश्विनच्या या खास फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
भारतातील दुसरा यशस्वी गोलंदाज
अश्विन भारताकडून टेस्ट खेळणारा हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अश्विनने 537 विकेट आपल्या नावे केले आहेत. तसेच टेस्टमध्ये भारतातून सर्वात जास्त विकेट खेळणारा खेळाडू म्हणून अनिल कुंबळे यांच्या नावाची नोंद आहे. कुंबळे यांनी टेस्टमध्ये 69 विकेट घेतला आहेत.
तिसरा कसोटी सामना ड्रॉ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना ड्रॉ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मालिका अजूनही 1-1 अशी बरोबरीत आहे. आता मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.