Mohammed Shami : आगामी T20World Cup पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 World Cup 2022 मधून बाहेर पडला आहे (Jasprit Bumrah Out From T20 World Cup). त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं होतं. त्याच्या जागी आता मोहम्मद शमी (Mohammed Shami) किंवा दीपक चहरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. (Before the T20 World Cup Mohammed Shami's post went viral sharing the video Sports Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami Fitness) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात खेळताना दिसू शकतो. मात्र, त्याचा फिटनेस हा संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. शमी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेद्वारे संघात पुनरागमन करणार होता, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच तो कोविड पॉझिटिव्ह आढळला, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आता आगामी विश्वचषकात शमी पहायला मिळेल, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ T20World Cup मध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. मात्र, राखीव खेळाडू सध्या भारतातच असल्याने शमी टीम इंडियाचा भाग असेल की नाही, हा चर्चेचा विषय आहे.


Mohammed Shami ची पोस्ट- 


मोहम्मद शमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो त्याने आज त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शमी 'ओये राजू प्यार ना कर्यो दिल टूट जाता है' गाण्यात लिप्सिंग करताना दिसत आहे. कोणावरही प्रेम करू नका, असा सल्ला जणू काही शमी सर्वांना देताना दिसतोय.



दरम्यान,  बीसीसीआयने (BCCI) अद्याप बुमराहच्या जागेवर कोण खेळेल याची घोषणा केलेली नाही. शमीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं, जरी चहर आणि मोहम्मद सिराज हे देखील दावेदार आहेत, असं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर द्रविडने संकेत दिले होते.


आणखी वाचा- T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहला राग अनावर, टीकाकारांना दिलं कडक उत्तर, पोस्ट करत म्हणाला...