Hockey WC 2023: `मला वाईट वाटते की, भारतात...`, बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप
Belgium player Allegation: पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळालं आहे. यापूर्वी 2010 या वर्षी नवी दिल्लीत वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 साली भुवनेश्वर येथे आणि चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या 15 पर्वात भारताला मिळालेली ही तिसरी संधी आहे.
Belgium player Elliot Van Strydonck Allegation: पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळालं आहे. यापूर्वी 2010 या वर्षी नवी दिल्लीत वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 साली भुवनेश्वर येथे आणि चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या 15 पर्वात भारताला मिळालेली ही तिसरी संधी आहे. मात्र भारताला पुन्हा आयोजनपदाची संधी मिळाल्याने बेल्जियमचा हॉकीपटू एलियट व्हॅन स्ट्रायडॉनक याने नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्डकप आयोजन पुन्हा भारतात होत असल्याने टीकास्त्र सोडलं आहे. इतकंच काय तर, पैशांच्या जोरावर भारताने ही संधी मिळवल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.
बेल्जियमचा हॉकीपटू एलियट व्हॅन स्ट्रायडॉनक याने मीडियाशी बोलताना सांगितलं की, "मागच्या चार वर्ल्डकप पैकी तीन वर्ल्डकपचं आयोजन भारतात होत आहे. हे कसं काय शक्य आहे. हा पैशांचा खेळ आहे. बेल्जियन लोकांना भारत आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत चांगल्याप्रकारे माहिती आहे. पाणी आणि खाण्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. असं असूनही भारतात स्पर्धेचं आयोजन केलं जातं हे खेदजनक आहे."
"भारत एकमेव असा देश आहे की, स्टेडियममध्ये 20 हजार जागा प्रेक्षकांनी भरू शकतो. हिरो आणि ओडिशा सरकारसारख्या प्रायोजकांवर अवलंबून आहे. आर्थिकदृष्ट्या पाहता भारताची निवड अर्थपूर्ण आहे. पण क्रीडा निष्पक्षतेसाठी अन्यायकारक आहे. रेड लायन्स मागच्या 4 वर्षात बरंच काही मिळवलं आहे. असं असलं तरी हॉकीचे कव्हरेच मर्यादित आहे.",असं व्हॅन स्ट्रायडॉनक यांनी बेल्जियम वृत्तपत्र ला लिब्रेला सांगितलं आहे.
भारताची हॉकी वर्ल्डकपमधील स्थिती
भारताने हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली आहे. स्पेनचा 2-0 ने पराभव करत विजयी घोडदौड सुरु केली आहे. भारताकडून अमित रोहिदास आमि हार्दिक सिंहने प्रत्येकी एक गोल केला. भारताने या सामन्यात दोन गोल झळकावत 200 गोलच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात 200 गोल करणारा भारत हा तिसरा संघ आहे. दोन गोल करताच भारताची गोल संख्या 201 इतकी झाली आहे. आता भारताचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे.