इंग्लंडचा क्रिकेटर बेन स्टोक्सला मोठा झटका
इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ झालीये. गेल्या काही दिवसांत त्याचा रस्त्यावर हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होताय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी) ने त्यांच्यावर बंदी घातलीये.
ब्रिस्टल : इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर बेन स्टोक्सच्या अडचणीत वाढ झालीये. गेल्या काही दिवसांत त्याचा रस्त्यावर हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होताय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी) ने त्यांच्यावर बंदी घातलीये.
बेन स्टोक्ससह अॅलेक्स हेल्सवरही बंदी घालण्यात आलीये. दरम्यान, या दोनही क्रिकेटरना पूर्ण वेतन दिले जाईल आणि अनुशासनात्मक आयोगाच्या निर्णयानंतर याबाबात निर्णय घेतला जाईल.
ईसीबीच्या माहितीनुसार, या दरम्यान दोनही क्रिकेटर्सची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवड केली जाणार नाहीये. ब्रिस्टलमध्ये भर रस्त्यात हाणामारी करत असतानाच व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये स्टोक्सनं एका व्यक्तीला एका मिनीटामध्ये १५ पंच मारताना दिसतोय.