बेन स्टोक्स शेवटपर्यंत लढला, पाकिस्तानला हिसका दाखवला, 30 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला
झिरो ठरला विजयाचा खरा हिरो, शेवटपर्यंत झुंजला पण भावाने करून दाखवलंच!
Eng vs Pak Final 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंड संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंडने 5 गड्यांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला आहे. विजयाचा हिरो ठरलेल्या बेन स्टोक्सने शेवटपर्यंत तळ ठोकत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यासोबतच त्याने 30 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला आहे. (Ben stokes hero eng vs pak fnal t-20 world cup 2022 sport marathi news)
ऑस्ट्रेलियामध्ये 30 वर्षापुर्वी पाकिस्तान संघाने 1992 मध्ये पाकिस्तानने इंग्लंड संघाला पराभूत करत एकदिवसीय वर्ल्ड कप नावावर केला होता. या पराभवाची सल इंग्लंडच्या मनात कायम होती, 2019 मध्ये इंग्लंडने एकदिवसीय पहिला वर्ल्ड कप जिंकला. मात्र पाकिस्तानमुळे त्यावेळी हातचा वर्ल्ड कप लांबला गेला. मात्र आजच्या विजयाने 30 वर्षाचा हिशेब चुकता केला असं म्हणता येईल.
आजच्या विजयामध्ये 138 कमी धावांचा पाठलाग करता इंग्लंड संघाची पळताभूई झालेली दिसली. पहिल्याच षटकामध्ये शाहीन आफ्रिदीने हेल्सला 1 धावेवर माघारी पाठवलं. त्यानंतर हॅरिस रॉफने बटलर आणि साल्टला बाद करत इंग्लंड संघाला खिंडार पाडलं. एकीकडे गडी बाद होत होते तर दुसरीकडे बेन स्टोक्सने एक बाजू लावून धरली होती.
सुरूवातीला त्याने वेळ घेतला शेवटी सामना जवळ गेल्यावर मोठे फटके खेळत संघाला विजय मिळवून दिला. या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं तर त्याने साजेशी कामगिरी केली नव्हती. श्रीलंकेविरूद्ध 42 धावा आणि आज फायनलमध्ये 52 धावा सोडल्या तर इतर सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठती आली नाही. मात्र आजच्या सामन्यात इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकत नव्हता. मात्र स्टोक्सने मैदानावर तळ ठोकत मोईन अलीच्या साथीने संघाला विजयाची नौका पार करून दिली.
इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी 20010 साली पहिल्यांदा इंग्लंडने टी-20 चा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला