मुंबई : रणजी ट्रॉफीत बंगाल विरूद्ध झारखंड टेस्ट सामना रंगला होता. या सामन्यात झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयासह आणखीण एक गोष्ट विशेष होती, ती म्हणजे, बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी शतकं ठोकलं आहे.एखाद्या मंत्र्याने शतक ठोकल्याची ही पहिलीच वेळ आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंड विरूद्धच्या टेस्ट सामन्यात बंगालने 773 धावा चोपल्या. बंगालकडून अभिषेक रमनने 61, सुदीप घरामी याने 186 धावा, मजुमदारने 117 आणि शाहबाज अहमदने 78 तर क्रीडा मंत्री तिवारी यांनी 73 धावांची अर्धशतकी खेळी,या व इतर खेळाडूंच्या धावांच्या बळावर  बंगालने 773  धावा केल्या होत्या. 


झारखंडने पहिल्या डावात 298 चं धावा केल्या.  विराट सिंगचं शतक आणि नजीमचं अर्धशतक या बळावर त्यांनी ही धावसंख्या उभारती. 


बंगालने दुसऱ्या डावात 318 धावा केल्या. यामध्ये मनोज तिवारीने शतक ठोकल.  185 बॉल्समध्ये त्याने 136 धावा केल्या.  झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली. 


अनोखा विक्रम 


मनोज तिवारी हे बंगालचे क्रीडा मंत्री आहेत, मंत्री म्हणून ते आपल्या कार्यालयात बसून क्रीडा विषयक अनेक महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करत असतात. मात्र आज येथे काही उलटचं झालं. कार्यालयातला पेन बाजूला सारत त्यांनी बॅट उचलून शतकचं ठोकलं. 


मनोज तिवारी यांनी पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.  तर दुसऱ्या डावात शतक ठोकलं. तिवारी यांनी १३६ धावा केल्या होत्या. या त्याच्या खेळीत 19 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तिवारी यांनी रणजी ट्रॉफीमध्ये 88 वर्षात कोणीही करू शकले नाही अशी कामगिरी केली. राज्याचे क्रीडामंत्री असताना शतक करणारा मनोज पहिला खेळाडू ठरलाय.