Bengaluru Test Vs New Zealand:  भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. भारतीय संघाला बंगळुरुमधील या कसोटीत मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. पहिला संपूर्ण दिवस पावसामुळे खेळ वाया गेल्याने भारतीय संघाच्या फलंदाजांनी पाहुण्या संघातील गोलंदाजांसमोर नांगी टाकली. भारताचा संपूर्ण संघ 46 धावांमध्ये तंबूत परतला. भारताने अवघ्या 31.2 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावल्या.


न्यूझीलंडची उत्तम गोलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅट हेन्रीने 15 धावांमध्ये घेतलेल्या 5 विकेट्स आणि त्याला विल्यम ओरुरके याने 22 धावांमध्ये 4 विकेट्स घेत दिलेल्या उत्तम साथीमुळे न्यूझीलंडच्या संघाने पहिल्याच सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघाने अगदी सहजपणे फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनाच मैदानात टिकून राहणं एवढं कठीण का झालं असा प्रश्न पडावा इतक्या सहजपणे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उरलेली षटकं खेळून काढली. आता दुसऱ्या डावात भारताला आधी लीड भरुन काढत पुढे धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे.


एका खेळाडूला दहा वर्षांपूर्वीच...


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या सर्वबाद 46 च्या डावानंतर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माबरोबरच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली, स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि के. एल. राहुल यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच भारताचा डाव गडगडला. भारतीय संघाने मायदेशामध्ये सर्वात कमी धावा करणाऱ्या संघांच्या नकोश्या यादीत या डावामुळे तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. असं असतानाच इंग्लंडच्या एका खेळाडूला भारतीय संघ 46 धावांवर बाद होणार हे दहा वर्षांपूर्वीच ठाऊक होतं असा विचित्र दावा करणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 


कोण आहे हा खेळाडू त्याने काय म्हटलेलं?


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा अनेकदा त्याच्या जुन्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. अशीच चर्चा आता भारतीय संघ 46 धावावर बाद झाल्यानंतर सुरु झाली आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 46 धावांवर बाद झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 2014 रोजी आर्चरने त्याच्या ट्वीटमध्ये केवळ '46' हा आकडा पोस्ट केला होता. आता तोच आकडा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



अनेकांनी केला रिप्लाय


अनेकांनी भारताच्या या नकोश्या कामगिरीनंतर आर्चरला आधीपासूनच याची कल्पना होती असं म्हणत त्यावर रिप्लाय करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीच पाहा काही व्हायरल झालेले हे पोस्ट...


1)



2)



3)



4)



5)




आता भारतीय संघ या सामन्यात उरलेल्या तीन दिवस कसा खेळणार यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असला तरी हा सामना अनिर्णित ठेवण्यासाठीही भारतीय संघाला फारच उत्तम खेळ करावा लागणार हे स्पष्टच आहे.