VIDEO: भुवनेश्वर कुमारला लागली हळद
टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार हा आज विवाह बंधणात अडकणार आहे.
मेरठ : टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार हा आज विवाह बंधणात अडकणार आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
भुवनेश्वर आपली गर्लफ्रेंड नुपूर नागरसोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्नसोहळा पार पडल्यानंतर २६ आणि २९ नोव्हेंबर रोजी बुलंदशहर आणि दिल्ली येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.
भुवनेश्वर कुमार याच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. याच लग्न सोहळ्यातील काही क्षण भुवनेश्वर कुमारच्या फॅनक्लबने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोजमध्ये हळद लागल्याचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे क्षण पहायला मिळत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिखर धवनने भुवनेश्वरला "जोरु के गुलाम" होण्यावर प्रश्न विचारला होता. यावर भुवनेश्वर कुमारने म्हटलं होतं की, "याला प्रेम म्हणतात". शिखर धवनने हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता.
भुवनेश्वर कुमारच्या एका फॅन क्लबने त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
भुवनेश्वर आणि नुपूर यांचा विवाह सोहळा २३ नोव्हेंबरमध्ये मेरठमध्ये पार पडणार आहे. तर, २६ नोव्हेंबरला बुलंदशहरात आणि ३० नोव्हेंबरला दिल्लीत रिसेप्शन होणार आहे.
नुपूर नागर एक इंजिनिअर आहे आणि नोएडातील एका कंपनीत कामाला आहे. भुवनेश्वर आणि नुपूर एकमेकांचे शेजारी होते आणि दोघांचेही वडील पोलीस होते.