आशिया कपआधी भारताला दिलासा, भुवनेश्वर कुमार फिट
आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे.
मुंबई : आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे. भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारला फिट घोषित करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमार भारत ए कडून खेळेल. बुधवारी अलूरमध्ये ही मॅच खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंडमधली तिसरी वनडे खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. भुवनेश्वर कुमारच्या कंबरेला दुखापत झाली होती.
कंबरेच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला टेस्ट सीरिजलाही मुकावं लागलं आहे. लंडनमध्ये वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारला एनसीएमध्ये पाठवण्यात आलं. तेव्हा भुवनेश्वर कुमारला फिट होण्यासाठी ४ आठवडे लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण यानंतर भुवनेश्वर कुमार २ आठवड्यांमध्येच बॉलिंग करण्यासाठी फिट होईल, असं सांगण्यात आलं.
भुवनेश्वर कुमार फिट झाल्यामुळे आशिया कपमध्ये त्याला संधी मिळू शकते. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. पण भारताची पहिली मॅच १८ सप्टेंबरला होणार आहे. १९ सप्टेंबरला लगेचच भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.