भुवनेश्वर कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना बायको म्हणाली, `माझा सल्ला आहे की...`
भुवनेश्वर कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना बायकोने केली पाठराखण
Bhuvneshwar Kumar : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सध्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भुवीने अत्यंत खराब कामगिरी केली होती. अशा स्थितीत त्याला T-20 संघातून वगळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. भुवनेश्वरवर वाईट वेळ आली असताना त्याच्या बायकोने म्हणजेच नुपूर नागरने भुवीची साथ सोडली नाही. (bhuvneshwar kumar wife nupur nagar given Advice to trollers on instagram story)
नुपूर नागरने आपल्या इन्ट्राग्रामवरून स्टोरी शेअर करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांना काही कामधंदा उरला नाही, असं म्हणत तिने भुवीची पाठराखण केली. लोकांच्या हाताला आता काम उरलं नाही आणि त्यांना नकारात्मकता पसरवण्यासाठी वेळच वेळ आहे, असं म्हणत तिने ट्रोलर्सला टोले लगावले.
तुमच्या या अशा बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी लावा, असा सल्ला देखील नुपूरने यावेळी दिला. नुपूर नागरची ही स्टोरी तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं. पतीबद्दलचं प्रेम पाहून अनेकांना नुपूरचं कौतूक देखील केलं आहे.
19 व्या ओव्हरवरून वाद-
भारतीय संघाला (Team India) मागील काही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागत आहे. त्याला कारण ठरतंय भारतीय संघाची गोलंदाजी. प्रथम पाकिस्तान, नंतर श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) भारताची गोलंदाजी पराभवाचं कारण ठरली. या तीनही सामन्यात 19 वी ओव्हर सर्वात मारक ठरली.
मागील तिन्ही सामन्यात भुवनेश्वरने 19 वी ओव्हर टाकली होती. त्यावेळी भुवीने 3 षटकात 49 धावा दिल्या आहे. त्यामुळे भुवनेश्वरलसा संघात स्थान देऊ नये, असं क्रिकेटप्रेमींनी म्हटलं आहे. भुवनेश्वरने अनेक मोठमोठ्या सामन्यात भारताला विजयाचा उंबरठा दाखवला आहे. त्यामुळे भुवनेश्वरच्या खेळावर प्रश्नचिन्ह उभं करणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करणारा देखील एक वर्ग आहे.