मुंबई : थरार, नाट्य, दबाव, तणाव, खुन्नस, अपेक्षांचं ओझ, श्वास रोखून धरायला लावणारे क्षण हे सारं काही भारत पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट मुकाबल्यात पाहायला मिळतं. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा आपल्याला देशवासियांच्या या भावनांचं दर्शन घडणार आहे. यापूर्वीच्या आशिया चषकातील थरारक लढतींमध्ये भारतान पाकिस्तानला चारिमुंड्या चित केलं आहे.


1. २०१६, भारताचा पाकिस्तानविरुद्ध ५ गडी राखून विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढाका येथे झालेल्या या लढतीत वेगवान खेळपट्टीवर मेन इन ब्लूनं पाकिस्तान संघाचे केवळ ८३ धावांमध्ये सर्व गडी बाद केले. तर पाकिस्ताननंही ८ धावांमध्ये भारताचे तीन गडी बाद केले. मात्र भारताचा तेव्हाचा उपकर्णधार विराट कोहलीनं ४९ धावा करत भारताला विजय साकारून दिला. 


2. २०१४, पाकिस्तानचा भारताविरुद्ध १ गडी राखून विजय


ढाका येथे २०१४ मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत रंगली होती. या लढतीत अखेरच्या षटकात पाकिस्तानला जिंकण्यासाठी १० धावांची गरज होती. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर शाहिद आफ्रिदीनं दोन षटकार खेचत भारताला पराभवाची चव चाखायला भाग पाडलं होतं. 


3. २०१२, भारताचा पाकिस्तानविरुद्ध ६ गडी राखून विजय


ढाका येथे झालेल्या लढतीत पाटा खळपट्टीवर पाकिस्ताननं भारतासमोर ३३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांनी आपल्या खेळानं पाकिस्तानचं हे आव्हान लिलया पेलत भारताला विजय मिळवून दिला.


4. २०१०, भारताचा पाकिस्तानविरुद्ध ३ गडी राखून विजय 


दम्बुल्ला येथे झालेल्या या मुकाबल्यात पाकिस्ताननं ३०० धावा केल्या होत्या. या सामन्यात अखेरच्या चार चेंडूंमध्ये भारताला विजयासाठी ६ धावांची गरज होती. तर केवळ तीन गडी भारताच्या हातात होते. प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना रैना बाद झाला. मात्र भज्जीनं शोएब अख्तरचा धैर्यानं मुकाबला करत भारताला विजय साकारुन दिला.


5. १९८८, भारताचा पाकिस्तानविरुद्ध ४ गडी राखून विजय


प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं १४२ धावा केल्या. भारतानं ११६ धावांवर ६ गडी गमावले होते. मात्र मोहिंदर अमरनाथ यांच्या ७४ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचं आव्हान पार करत विजय साकारला.