नवी दिल्ली : तुम्ही जर WWEचे चाहते असाल तर, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, जॉन सीना आणि WWE यांचे किती नाते किती घनिष्ठ आहे. पण, याच नात्यात दुरावा येण्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि WWEला मोठा झटका बसल्याचे पुढे आले.


WWEच्या प्रेक्षक संख्येत घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवून एलिमिनेशन चेंबर पीपीव्हीची नुकतीच शानदार सांगता झाली. WWEच्या इतिहासात हा काळ ठळक अक्षरांनी नक्कीच लिहीला जाईल. मात्र, असे असूनही WWEला आपली व्ह्यूवरशीप कायम ठेवता आली नाही. २६ फेब्रुवारीला एलिमिनेशन चेंबरमध्ये जॉन सीनाचा पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडिया त्याच्या निवृत्तीची बातमी व्हायरल झाली. अर्थात या बातमीला WWE किंवा खुद्द जॉन सीनाकडूनही पुष्टी मिळाली नाही. पण, त्याचा परिणाम WWEच्या व्ह्यूवरशीपवर मात्र भलताच झाल्याचे वृत्त आहे. 


प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार २६ फेब्रुवारीला झालेल्या एपिसोडमध्ये साधारण ३.१८० मिलियन व्ह्यूवर्स होते. त्याच्या आगोदर हिच संख्या ३.२८३ मिलियन इतकी होती. मात्र, २६ फेब्रुवारीनंतर मात्र, हिच संख्या १,०३,००० व्ह्यूवर्सने कमी झाल्याचे आढळले.


दरम्यान, एलिमेशन चेंबरनंतर झालेल्या रॉमध्ये या आठवड्यात रोमन रेन्स, जॉन सीना, द मिज आणि रोंडा राऊजी यांची फाईट पहायला मिळाली.


'रॉ'ला प्रती तास मिळालेले रेटींग


पहिला तास - ३.४०७ मिलियन
दुसरा तास  - ३.२४९ मिलियन
तीसरा तास - २.८८४ मिलियन