निगेटीव्ह...! T20 वर्ल्डकप तोंडावर असताना `या` खेळाडूच्या सोशल मीडिया पोस्टने नवी खळबळ?
या खेळाडूला आफ्रिकेच्या विरोधात आगामी टी-20 सीरिजमधून देखील बाहेर पडावं लागलं होत.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ऑस्ट्रेलिया विरोधातील टी-20 सीरिजमध्ये खेळणता आलं नाही आणि त्याचबरोबर आफ्रिकेच्या विरोधात आगामी टी-20 सीरिजमधून देखील बाहेर पडावं लागलं होत. दहा दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत झालेल्या मोहम्मद शमीचा कोरोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आला आहे. याबद्दलची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
मोहम्मद शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे कोविड-19 (Covid-19 Report) चा निगेटिव्ह असलेल्या रिपोर्टचा फोटो शेअर करत 'निगेटिव्ह' असं कॅप्शनसुद्धा दिलं आहे.
मोहम्मद शमी ऐवजी उमेश यादवला आगामी साऊथ आफ्रिकेच्या विरोधात होणाऱ्या तीन दिवसीय सामन्याच्या टी-20 मध्ये संधी देण्याची घोषणा बीसीसीआयने केल्यानंतर काही तासातच शमीने त्याच्या निगेटिव्ह रिपोर्टचा फोटो शेअर केला.
'कोविड-19 संक्रमणातून मोहम्मद शमी हे अद्याप पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्याचबरोबर, आगामी तीन सामन्यांच्या टी-20 सीरीजमध्ये सहभागी होणार नाहीत. अखिल भारतीय सीनियर निवड समितीने उमेश यादवला शमी ऐवजी खेळण्याची संधी दिली आहे.', असं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं आहे.
वाचा...
IND vs AUS : टीम इंडियाच्या या क्रिकेटरला कोरोनाची लागण