IND vs AUS : टीम इंडियाच्या या क्रिकेटरला कोरोनाची लागण

टी-20 विश्वचषकापूर्वी (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका (India vs Aus) खेळणार आहे.   

Updated: Sep 17, 2022, 11:56 PM IST
IND vs AUS : टीम इंडियाच्या या क्रिकेटरला कोरोनाची लागण title=

IND vs AUS : टी-20 विश्वचषकापूर्वी (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका (India vs Aus) खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा एक स्टार वेगवान गोलंदाज कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. (team india bolwer mohammed shami tested covid positive and ruled out to against australia t 20i series)

हा खेळाडू बाहेर? 

क्रिकबझनुसार, स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं आहे. शनिवारी (17 सप्टेंबर) संघ मोहालीला पोहोचला. यावेळेस ही सर्व माहिती बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटपर्यंत पोहचली.  ऑस्ट्रेलियाचा संघही पंजाबमध्ये पोहचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाला मोठा धक्का

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडताच भारतीय संघाला तगडा झटका लागलाय.  मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटची टी-20 मॅच 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता.   तेव्हापासून तो टीम इंडियातून इन-आऊट होत आहे.  शमीने भारताकडून 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.