IPL 2022 : मुंबईला मोठा धक्का, स्फोटक फलंदाजाला दुखापत
मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मुंबई : आयपीएल 2022 चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई संघाचा पहिला सामना दिल्लीसोबत होणार आहे. या सामन्याआधी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून अजून तो सावरला नाही.
अंगठ्याच्या दुखापतीमधून पूर्ण फिट होण्यासाठी त्याला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही याबाबत सध्या तरी प्रश्न आहे. 27 मार्च रोजी मुंबई विरुद्ध दिल्ली सामना होणार आहे.
सूर्यकुमार यादववर BCCI च्या सीनियर अधिकाऱ्यांनी देखील आपलं मत दिलं आहे. सूर्यकुमार खेळणार की नाही याबाबत आताच काही सांगणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सूर्यकुमार लवकर बरा व्हावा यासाठी मुंबईच्या खेळाडूंसह चाहते प्रार्थना करत आहेत.