मुंबई : आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची धमाल पाहायला मिळत आहे. युवा वेगवान बॉलर उमरान एकामागे एक विक्रम करत आहे. टीम इंडियात संधी मिळण्याआधीच त्याच्या नावावर दोन रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याची उत्तम कामगिरी पाहून आता टीम इंडियातून त्याला खेळवण्याची मागणी अनेक दिग्गजांनी उचलून धरली आहे. 


उमरान मलिकच्या नावावर मोठा रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 17 मे रोजी उमरानने एक अनोखा रेकॉर्ड मोडला. यॉर्कर किंग बुमराहचा 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडण्यात उमरानला यश आलं आहे. त्याने कमी वयात 20 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हा विक्रम बुमराहने 2017 मध्ये केला होता. 


बुमराहचा हा विक्रम 2017 नंतर कोणीच मोडू शकलं नाही. यंदाच्या हंगामात मात्र उमराननं हा विक्रम मोडून काढला. हैदराबादने 3 धावांनी मुंबईवर विजय मिळवला. उमरानने 3 विकेट्समध्ये 23 धावा देऊन तिघांना तंबुत पाठवलं


वेगानं बॉल टाकण्याचा रेकॉर्ड


उमरान मलिकने 15 व्या हंगामात 157 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकला. त्याच्या या रेकॉर्डची नोंद करण्यात आली.  इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि  टिळक वर्माला तंबुत पाठवलं. उमरानने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचं कौतुक होत आहे. 


उमरानला टीम इंडियातून खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी सगळ्यांकडून होत आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत उमरानचा चौथा क्रमांक आहे. 


आयपीएलमध्ये कमी वयात 20 विकेट्स एकाच हंगामात घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने जसप्रीत बुमराहचा 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील रेकॉर्ड मोडला आहे. 


उमरान मलिक - वय 22 वर्ष
जसप्रीत बुमराह आयपीएल 2017 वय 23 वर्ष 
आरपी सिंह- आयपीएल 2009 वय 23 वर्ष 
प्रज्ञान ओझा - आयपीएल 2010 वय 23 वर्ष