बर्थ डे स्पेशल व्हिडिओ : अनहोनी को होनी कर दे, काहीसा असा आहे धोनी
भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार आणि यशस्वी कर्णधार महेंद्र धोनी ७ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतो आता तो ३६ वर्षांचा झाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार आणि यशस्वी माजी कर्णधार महेंद्र धोनी ७ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतो आता तो ३६ वर्षांचा झाला आहे.
धोनी एकटा कर्णधार आहे की त्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यात वर्ल्ड कप, टी २० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे.
धोनीच्या आयुष्यात काही संस्मरणीय क्षण आहेत. पाहूया कोणते...
रॉस टेलरचा रन आऊट
२०१६ मध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या वन डेमध्ये धोनीने रॉस टेलरला काही अशा प्रकारे बाद केले की सर्व हैराण झालेत. धोनीने थ्रो पकडला आणि न बघता स्टंपावर मारला आणि टेलरला बाद केले.
टी-२० वर्ल्डमध्ये मुस्तफिजूरला केले रन आऊट
२०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरूद्ध सामना अंतीम षटकांपर्यंत आला तेव्हा बांगलादेशला एका चेंडूत दोन धावा पाहिजे होत्या. त्यावेळी धोनीने धावत जाऊन मुस्तफिजूरला बाद केले. भारताने हा सामना १ धावेने जिंकला होता.
धोनीच्या सिक्सरने जिंकलं पुणे सुपर जायंट
२०१६ च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाब विरूद्ध खेळताना जेव्हा पुण्याला शेवटच्या ओव्हरमध्ये २३ धावा पाहिजे होत्या त्यावेळी अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर धोनीने २३ धावा काढल्या. यात त्याने ३ षटकार लगावले. शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार लगावले होते.
धोनीच्या दोन षटकार आणि एका चौकाराने जिंकली सिरीज
२०१३मध्ये वेस्ट इंडिजमध्ये ट्राय सिरीजच्या फायनलमध्ये शेवटच्या षटकात १५ धावा पाहिजे होत्या आणि एक विकेट शिल्लक होती.
त्यावेळी धोनीने पहिल्या चार चेंडूत २ षटकार आणि एक चौकार लगावत अनपेक्षित विजय मिळवून दिला.
वर्ल्ड कप जिंकविणारा षटकार
या शिवाय धोनीने २०११ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ९१ धावांची शानदार खेळी केली. पण त्याचा शेवटचा विजयी षटकार हा कायम लक्षात राहणारा आहे. सुनील गावस्कर म्हटला की मरणापूर्वी धोनी हा सिक्सर जरूर पाहणार २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणार हा सिक्सर होता.