नवी दिल्ली : भारतीय संघाचे धुरंदर स्पिनर बिशन सिंह बेदी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेदी हे टीम इंडियाचे सदस्य राहिले असून आता त्यांनी क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. मात्र त्यांच्या सडेतोड बोलण्यात कधीच बदल झाला नाही. ज्यांना कधीही काहीही वेगळं वाटलं ते त्यांनी स्पष्टपणे मांडलं. आणि याचमुळे अनेकदा लोकं त्यांच्यावर नाराज असतं. मात्र बेदी यांना कधीच फरक पडला नाही. त्यांनी कायम आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. 


आता पुन्हा एकदा बेदी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या विरोधात उग्र होताना दिसले आहेत. त्यांनी बीसीसीआयच्या विरोधात म्हटलं आहे की, भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डातून नियंत्रण शब्द काढून टाकला पाहिजे कारण ते हुकूमशाही सुचवते. 


बेदी यांनी नेमकं काय म्हटलं? 


भारतीय टीम जर्सीवर भारताचा तिरंगा लोगो म्हणून आहे. त्यावर बीसीसीआयचा लोगो नाही. माझा विचार अगदी स्पष्ट आहे. खेळाडू बीसीसीआयसाठी नाही तर भारतासाठी खेळतात. न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय प्रतिक चिन्ह आहे. इंग्लंडचे देखील स्वतःचे चिन्ह असून पाकिस्तान आणि बांग्लादेश देखील आपले राष्ट्रीय चिन्ह लावते. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा क्रिकेट बोर्ड असं नाव असणं गरजेचं आहे. 


बेदीने श्रीलंकाच्या विरूद्ध खेळलेल्या सिरीजवर देखील प्रश्न उभे केले होते. त्यांनी म्हटले की, या सिरीजमधून आपल्याला काय मिळत आहे. आपण फक्त एका पाठोपाठ एक त्यांच्या विरोधात खेळत आहोत. त्यांना त्यांच्या भूमीत हरविल्यानंतरही आपण सतत खेळत आहोत. यामध्ये कोणताच सामना नाही. आणि या खेळाला काहीच अर्थ नाही. तसेच बेदी म्हणाले की, ही सिरिज नसती तर खेळाडू रणजी ट्रॉफी खेळले असते. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचा अभ्यास देखील महत्वाचा आहे.