क्रिकेट वर्ल्डकप: भारताने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
भारतीय टीमने दृष्टीहीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या टीमला पराभवाची धूळ चारली आहे.
दुबई : भारतीय टीमने दृष्टीहीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या टीमला पराभवाची धूळ चारली आहे.
भारतीय टीमने पाकिस्तान क्रिकेट टीमचा सात विकेट्सने पराभव केला आहे.
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी भारतीय टीमने टॉस जिंकत पाकिस्तानच्या टीमला पहिली बॅटींग करण्यास आमंत्रण दिलं. यानंतर मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या टीमने ४० ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत २८२ रन्स केले.
पाकिस्तानच्या टीमने दिलेलं आव्हान भारतीय टीमने अवघ्या ३४.५ ओव्हर्समध्येच गाठलं. या दरम्यान भारतीय टीमने तीन विकेट्स गमावले.
भारतीय टीमच्या विजयामध्ये दीपक मलिक याचा मोलाचा वाटा राहीला. दीपक मलिकने ७९ रन्सची इनिंग खेळली. तर, व्यंकटेशने ६४ रन्सची इनिंग खेळली.
पाकिस्तानच्या टीमकडून मोहम्मद जामिलने नॉट आऊट ९४ रन्स केले तर, कॅप्टन निसार अलीने ६३ रन्स केले दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १३७ रन्सची पार्टनरशीप केली. अजय रेड्डीने जामिलचा विकेट घेत ही जोडी तोडली.