मुंबई : पुरुषसत्ताक क्रिकेट विश्वामध्ये काही वर्षांपूर्वी एक अशी क्रांती घडली, ज्याची दखल संपूर्ण जगानं घेतली. जागतिक स्तरावर भारतातील एका महिलेच्या नावाची तुफान चर्चा झाली. तिचा क्रिकेट प्रेझेंटर म्हणून असणारा प्रवास सर्वांना हेवा वाटेल असाच होता. (Cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्क्रीनवरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही अनेकांना प्रेरणा देणारं हे नाव आहे, अभिनेत्री मंदिरा बेदी . 


मंदिरानं सध्या केलेलं वक्तव्यं संपूर्ण क्रीडा जगताला हादरवणारं ठरत आहे. जवळपास 19 वर्षांनंतर मंदिरानं हा खुलासा करत आपल्याशी वाईटपणे वागणाऱ्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. 


2003 मध्ये मंदिरानं क्रिकेट जगतामध्ये प्रेझेंटर म्हणून पदार्पण करत या खेळाला ग्लॅमरस टच दिला होता. पण, तिचा हा अनुभव फारसा चांगला नव्हता. 


बऱ्याच क्रिकेटर्सनी तिला हीन वागणूक दिली, ती कोणताही प्रश्न विचारत असेल तेव्हा काहीजण तिच्याकडे एकटक पाहत राहायचे, ती कशी प्रश्न विचारतेय यावर त्यांचं लक्ष असायचं, त्यांचं असं वागणं तिला घाबरवून जात होतं. 


मंदिरानं 2003 आणि 2007 मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL च्या दुसऱ्या पर्वासाठी सूत्रसंचालन केलं होतं. 


काय म्हणाली मंदिरा? 
क्रीडा विश्लेषण, मुलाखतींच्या वेळी नेमकं काय घडायचं, याबाबत सांगताना मंदिरा म्हणाली; 'माझ्याकडे बरेच क्रिकेटपटू नजर रोखून पाहायचे. ही काय आम्हाला विचारणार... असाच त्यांचा अविर्भाव असायचा. 


ते जी उत्तरं द्यायचे ते माझ्या प्रश्नाशी संबंधित नसायचे. माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत भीतीदायक होता. माझा आत्मविश्वास कोलमडला होता. पण, माध्यम प्रसारकांनी मला धीर दिला. 


तुमची निवड 200 महिलांमधून करण्यात आली आहे, तुम्ही उत्तमच आहात. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा', असं त्यांनी तिला सांगितल्याचं मंदिरा म्हणाली. 


एका महिलेला सोबतचे विश्लेषक आणि खेळाडूही स्पोर्ट्स अँकर म्हणून स्वीकारू शकत नव्हते, असं मंदिरानं स्पष्ट केलं. 



आता राहिला मुद्दा असा, की सोशल मीडियावर दमदार फॉलोइंग असणाऱ्या या मंदिराला नेमकी अशी वागणूक कोणी आणि का दिली असावी? खरंच एका महिलेचं असं पुढे जाणं पुरुषांना रुचलं नसावं?