AUS vs IND: श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळपास 1 महिना आराम मिळणार आहे. मात्र त्यानंतर टीम इंडियाचं शेड्यूल बिझी असणार आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस इंडियन क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. 5 सामन्यांची ही टेस्ट सिरीज असून या सिरीजमध्ये टीम इंडिया प्रॅक्टिस सामने देखील खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने शेवटच्या दोन्ही टेस्टा सिरीज जिंकल्या होत्या. 


दुसऱ्या टेस्टपूर्वी खेळणार अभ्यास मॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजदरम्यान दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. टीम इंडिया 30 नोव्हेंबरपासून कॅनबेरातील मनुका ओव्हलमध्ये पंदोन दिवसीय डे-नाईट सराव सामना खेळणार आहे. भारतीय टीमला ॲडलेडमधील डे-नाईट टेस्ट सामन्याची तयारी करण्यासाठी हा सराव सामना खेळवण्यात येणार आहे.


हेसुद्धा वाचा : Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'


 


2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने डे-नाईट टेस्ट सामनाही खेळला. हा सामना भारतीय क्रिकेटच्या सर्वात लाजिरवाण्या टेस्ट सामन्यांपैकी एक मानला जातो. या सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 36 रन्समध्ये ऑल आऊट झाला होता. टीम इंडियाची इतका दारूण पराभव झाल्यानंतरही भारताने 4 सामन्यांची ती सिरीज 2-1 अशी जिंकली होती. या सिरीजमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा गाबामध्ये पराभव केला होता.


कसा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा


22 ते 26 नोव्हेंबर 2024– पहिली टेस्ट, पर्थ स्टेडियम
6 ते 10 डिसेंबर 2024– दुसरी टेस्ट, एडिलेड ओवल (D/N)
14 ते 18 डिसेंबर 2024 – तिसरी टेस्ट, द गाबा
26 ते 30 डिसेंबर 2024 – चौथी टेस्ट, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
3 ते 7 जानेवारी 2025 – पाचवी टेस्ट, सिडनी क्रिकेट ग्राउंड


22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार सिरीज


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजमधील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या दोन टीममध्ये 1991-92 नंतर पहिल्यांदाच पाच टेस्ट सामन्यांची सिरीज होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ 2014-15 पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने गेल्या चार सिरीजवर नार कोरलं असून या सर्व सिरीजचा निकाल भारताच्या बाजूने 2-1 असा लागला होता. त्यामुळे यंदाच्या टेस्ट सिरीजवरही चाहत्यांचं लक्ष असणार आहे.