Hardik Pandya Reaction: गुरुवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबचा 9 रन्सने पराभव केला. या विजयासह मुंबईच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशाही जाग्या आहेत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 197 रन्स केले होते. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्जचा डाव 19.1 ओव्हरमध्ये अवघ्या 183 रन्सवर आटोपला. या थरारक विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या सिझनमधील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय होता. हा खेळ तुमच्या कॅरेक्टरती परीक्षा घेईल, असं हार्दिक पांड्याने सामन्यापूर्वी सांगितले. हार्दिक म्हणाला, आयपीएलमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आशुतोष शर्माने चांगली फलंदाजी केली. त्याला भविष्यासाठी शुभेच्छा. मी माझ्या टीममधील खेळाडूंना टाईम आऊटच्या दरम्यान सांगितलं होते की, तुम्ही खेळात किती पुढे आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला खेळावर नियंत्रण ठेवावे लागेल.


डेथ ओव्हरच्या गोलंदाजीबाबत काय म्हणाला हार्दिक?


मुंबई इंडियन्सचे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकले असते, मात्र तसं होऊ शकलं नाही, असं मतंही हार्दिक हार्दिकच्या म्हणण्यानुसार, डेथ ओव्हर्समध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करू शकलो नाही, पण विजय हा विजय आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. 


आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला. आशुतोष शर्माच्या वादळी खेळीनंतर देखील पंजाब किंग्जने सामना गमावला. मुंबईने तीन सामने जिंकत 6 गुण नावावर केले आहेत. त्यामुळे आता मुंबईने 7 व्या स्थानी झेप घेतली आहे. 


मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचं गणित


मुंबई इंडियन्सने सात सामने खेळले असून अजून सात सामने बाकी आहेत. कोलकातासोबत दोन सामने तर लखनऊविरुद्ध दोन सामने मुंबईचे असणार आहे. तर मुंबईला टेबल टॉपर राजस्थानविरुद्ध एक, तर दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता मुंबईला जर विजय हवा असेल तर आगामी 7 सामन्यात कमीतकमी 5 सामने जिंकावे लागणार आहे. उर्वरित 7 सामन्यांपैकी 4 सामने मुंबईसाठी अवघड असतील. त्यामुळे आता पांड्याच्या नेतृत्वात मुंबई प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.