मुंबई : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांविरूद्ध चुकीचे वक्तव्य केलं. यामुळे सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टिका होत आहे. बीसीसीआयने देखील दोन सामन्यांमधून दोघांच निलंबन केलं आहे. यामुळे शनिवारी ते ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये देखील खेळणार नाहीत. असं असताना हार्दिक पांड्याच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कॉफि विथ करण'च्या शोमध्ये त्यांनी महिलांविरूद्ध केलेल्या टिप्पणीमुळे पांड्या आणि राहुल यांची प्रतिमा अतिशय खराब झाली आहे. यामुळे आता त्यांच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या मलीन प्रतिमेमुळे जाहिरात कंपन्यांचा देखील त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे जाहिरात कंपन्यांनी त्यांना ब्रँड ऍम्बेसिडर पदावररून काढून टाकलं आहे. 


कोणत्या कंपनीने घेतला इतका मोठा निर्णय 


याचा मोठा आणि पहिला फटका हार्दिक पांड्याला पडला आहे. या वादामुळे रेझर जिलेट (Gillette Mach 3) पांड्याला ब्रँड ऍम्बेसिडर पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, पांड्याने आता केलेल्या वक्तव्यांचा कंपनीशी काहीही संबंध नाही. 


पुढील आदेश येईपर्यंत पांड्या या कंपनीच्या ब्रँडला प्रमोट करणार नाही. हार्दिक पांड्या सध्या 7 कंपन्यांचा ब्रँड ऍम्बेसिडर आहे. तसेच केएल राहुल जर्मन स्पोर्टसविअर ब्रँड पूमा आणि फिटनेस स्टार्टअप क्योराफिटची जाहिरात करतो. दोघांशी जोडल्या गेलेल्या इतर कंपन्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण आगामी दिवसांत ते निर्णय घेण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाला हरभजन?


एका वाहिनीशी बोलताना हरभजन सिंह म्हणाला की, आम्ही मित्रांसोबत देखील अशा भाषेत बोलत नाही, ज्या भाषेत हे टेलिव्हिजनवर बोलले आहेत. यामुळे प्रेक्षकांना देखील प्रश्न पडेल की, सर्व क्रिकेटपटू असेच असतात की काय. अनिल कुंबळे, हरभजन सिहं आणि सचिन तेंडूलकर देखील असेच होते का? असे देखील प्रेक्षकांना वाटू शकते. या दोघांवर योग्य ती कारवाई केली गेली आहे, असं हरभजनला वाटतंय. तसंच या निलंबनाच्या कारवाईचं हरभजनने समर्थन केलं.