मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL), म्हणजेच आयपीएलला T20 क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत या क्रिकेट टूर्नामेंटला Vivo ची टायटल स्पॉन्सरशिप होती. परंतु आता ही जागा टाटा ग्रुपने घेतली आहे. म्हणजेच यावर्षीच्या आयपीएलमध्ये तुम्हाला टाटाचं नाव सर्वत्र पाहायला मिळणार नाही. ज्यामुळे ही स्पर्धा आता Vivo IPL नाही तर TATA IPL म्हणून ओळखली किंवा बोलली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा ग्रुपला आयपीएलचा टायटल स्पॉन्सर मिळाल्याने आणि चिनी मोबाईल कंपनीला जोरदार धक्का बसला आहे. ही डिल कधी झाली आणि टाटाने ही स्पॉन्सरशिप किती रुपयात विकत घेतली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. 


आयपीएलचा इतिहास पाहिला तर 2008 पासून सुरू झालेला या स्पर्धेचा प्रवास अजूनही सुरू आहे. आयपीएल गेल्या 13 वर्षांत खूप वाढले आहे आणि जगभरात त्याचे चाहते आहेत.


आयपीएल सुरू झाल्यापासून पाहिले तर टाटा आयपीएलच्या इतिहासातील पाचवे आयोजक असतील ज्यांना टायटल स्पॉन्सरशिप दिली जाईल.


टाटा आणि विवोपूर्वी आयपीएलचे आयोजक कोण होते आणि त्यांनी यासाठी किती पैसे मोजले हे जाणून घेऊया.


• वर्ष 2008 ते 2012 - DLF IPL (रु. 40 कोटी प्रतिवर्ष)
• वर्ष 2013 ते 2015 - पेप्सी आयपीएल ((रु. 79.2 कोटी प्रति वर्ष)
• वर्ष 2016 ते 2017- Vivo IPL (रु. 100 कोटी प्रति वर्ष)
• वर्ष 2018 ते 2019- Vivo IPL (रु. 439.8 कोटी प्रति वर्ष)
• वर्ष 2020- ड्रीम 11 IPL (रु. 222 कोटी)
• वर्ष 2021- (Vivo IPL रु 439.8 कोटी)
• वर्ष 2022- TATA ग्रुप (किंमत अद्याप समोर आलेली नाही)


हे लक्षात घेण्यासारखे आहे की टायटल स्पॉन्सर असल्यामुळे कंपनीचे नाव आयपीएलशी जोडले गेले आहे. 2023 पासून आयपीएलचे मीडिया अधिकारही वितरित केले जातील. आतापर्यंत स्टारकडे हे अधिकार होते. मात्र पुढच्या वर्षीपासून ते देखील बदलणार आहेत. ज्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आधीच आशा व्यक्त केली आहे की,  या मीडिया राईट्सची किंमत 40 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते.


बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला आहे, अहमदाबाद आणि लखनऊच्या संघातून बीसीसीआयने 12 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.