पुणे : भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या सामन्यामध्ये बुमराहला त्याचे ५० विकेट पूर्ण करण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहसाठी आजचा सामना खास असणार आहे. सोबतच विकेट घेण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर असणार आहे. मागील सामन्यात न्यूझिलंडच्या बॅट्समनने भारतीय बॉलर्सचा सहज सामना केला. भारतीय बॅटींग लाईन ढासळल्यानंतर बॉलिंगमध्ये ही संघाला काही खास करता आलं नाही.


न्यूझिलंडने मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सहा गडी राखून भारतावर मात केली होती आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ४-१ ने मालिका जिंकली होती. २०१६ नंतर भारताचा हा सलग सहावा मालिका विजय होता. आता मात्र भारतीय संघाने आजचा सामना गमावला तर विजयाची मालिका खंडित होईल.