कानपूर :  टीम इंडियाने न्यूझीलंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये रोमांचक विजय मिळविला आहे. किवी टीमने भारताला जोरदार टक्कर देत ३३८ धावांचा पाठलाग करताना ३३१ धावा केल्या. पण या सामन्यात बुमराहने एक जबरदस्त रनआऊट केला.  त्याने या सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. पण यात बुमराहची एक चूक झाली. 



झालं असं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४७ व्या षटकात लेथमम ५१ चेंडूत ६५ धावा करून क्रिजवर होता. न्यूझीलंडचा स्कोअर ६ विकेटवर ३१२ धावा होता. या षटकातील शेवटचा चेंडू जसप्रितने ग्रँडहोमला टाकला. बुमराहचा हा यॉर्कर दोन्ही फलंदाज रन घेऊ इच्छित होते. पण धोनीकडे बॉल बघून ग्रँडहोमने आपला निर्णय बदलला आणि तो जागीच थबकला. दुसरीकडे नॉन स्ट्राइकर एंडला असलेला टॉम लॅथम खूप पुढे आला होता. 


बुमराहने धोनीकडे चेंडू मागितला आणि चेंडू मिळाल्यावर अर्ध्या पीचवरून निशाणा लावत स्टंप उडवला. हाच हा साममन्यातील टर्निंग पाइंट ठरला. या रनआऊटनंतर धोनी आणि बुमराह खूप हसायला लागले. 


धोनीने बुमराहला सांगितले की. तू पुढे जाऊन हाताने जरी स्टंप उडवला असता तरी तो आऊट झाला असता, पिचच्या मध्यभागी उभे राहून स्टंपवर निशाणा साधणे खतरनाक ठरले असते. त्याचा परिणाम काहीही होऊ शकला असता. पण बुमराहचा निशाणा ठीक लागला. 


खालील लिंकमध्ये व्हिडिओ आहे..



लेथमला बाद केल्यानंतर बुमराहने मॅचनंतर म्हटले की, मला स्टंपपर्यंत धावत जायला हवे होते. माझ्याकडे वेळ होता की मी हाताने स्टंप उडवू शकत होता. हे चांगले झाले की स्टंप्सवर चेंडू मारू शकलो. 


बुमराहने अशीच चूक इंग्लंडमध्ये केली होती. धोनी त्यावेळी त्याला समजावले होते. पण असे वाटते की मॅच प्रेशरमध्ये तो विसरला. त्यामुळे धोनी खूप हसायला लागला.