ENG vs PAK : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या गेलेल्या अखेरच्या फायनल सामन्यात (T20 World Cup Final ENG vs PAK) इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून धुव्वा उडवला. रोमांचक झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) आक्रमक फटकेबाजी करत संघाला सावरलं आणि वर्ल्ड कपवर इंग्लंडचं नाव कोरलं आहे. त्यानंतर आता इंग्लंडमध्ये दिवाळी (England beat Pakistan in T20 World Cup Final) साजरी होताना दिसते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या गोलंदाजीचं देखील कौतूक पहायला मिळतंय.
 
सामन्याच्या संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात पाहूया... टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्ताने नांगी टाकली. पाकिस्तानचे फलंदाज झटपट बाद झाले आणि पाकिस्तानने इंग्लंडने 138 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आम्हीही कमी नाही, हे पहिल्याच ओव्हरला दाखवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिन शहा अफ्रिदीने (Shaheen Afridi) अॅलेक्स हेल्सच्या दांड्या गुल करत पाकिस्तानच्या आशा पुन्हा जिवंत केल्या. तर दुसरीकडे हॅरिश रॉफने (Haris Rauf) धारधार मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. तर त्याला नसीम शहाच्या (Naseem Shah) इनस्विंग आणि आऊट स्विंगची साथ मिळाली. एकीवेळी 60 चेंडूत 61 धावांची गरज असलेला इंग्लंड सहज जिंकेल, अशी परिस्थिती होती. मात्र, मॅच फिरवली ती हॅरिश रॉफने... हॅरिशने बटलर आणि सॉल्टला बाद करत इंग्लंडचा टांगा पलटी केला. 


आणखी वाचा - शाहीन शाहने पहिल्याच ओव्हरमध्ये केल्या दांड्या गुल, इंग्लंड कोमात!


त्यामुळे अखेरच्या 5 ओव्हरमध्ये इंग्लंडला 41 धावांची गरज होती. बेन स्टोक्स आणि मोईन अली मैदानावर होते. या दोघांनंतर मॅच संपली, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, अशावेळी बटलरने (Jos Buttler) आपला हुकमी एक्का शाबुद ठेवला होता. मोईन अली बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा मैदानात कोण उतरणार याकडे होतं. त्यावेळी मैदानात उतरला तो (Liam Livingstone)...'लिविंग्स्टन'


पाहा अखेरच्या चेंडूचा व्हिडीओ - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, तोपर्यंत स्टोक्सने आपलं काम करून ठेवलं होतं. स्टोक्सने 16 व्या ओव्हरला वसुली पुर्ण केली. मोईन अलीच्या विकेटनंतर अनेकांची धाकधुक वाढली होती. मात्र, बटलरने लिविंग्स्टनला (Liam Livingstone) राखून ठेवलं आणि पाकिस्तानच्या भूवया उंचावल्या होत्या.