आयपीएलपूर्वी RCB ला मिळाला `ग्रीन` सिग्नल, विराटच्या पठ्ठ्यानं रचला `हा` खास रेकॉर्ड
Australia vs New Zealand : कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने (Cameron Green) शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे.
Cameron Green Leap Day Century : न्यूझीलंडमध्ये सध्या वेलिंग्टनच्या मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ vs AUS) यांच्यात 2 टेस्ट मॅचेसची सिरीज खेळली जात आहे. या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमवत 279 रन्स बनवले होते. कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे. अशातच टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला जमलं नाही, अशी खेळी कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) केली आहे.
कॅमेरुन ग्रीनचा तडाखा
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमेरुन ग्रीनच्या नावावर गेला. 89 धावांवर 4 गडी गमावून अडचणीत आलेली ऑस्ट्रेलियन संघाचा डाव कॅमेरुन ग्रीनने सावरला. दिवस संपताना नाबाद राहून कॅमेरुन ग्रीनने दुसरे कसोटी शतक (Cameron Green Century) पूर्ण केलं आणि संघाला सावरलं. ग्रीनच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिवस संपताना 9 गडी गमावून 279 धावा केल्या. 29 फेब्रुवारीला शतक झळकवून कॅमेरुन ग्रीन जगातील एका खास रेकॉर्ड रचला आहे.
चार वर्षांमध्ये एकदा येणारी 29 फेब्रुवारी ही तारीख (Leap Day 2024) क्रिकेटच्या जगातील काही निवडक खेळाडूंसाठी खास आहे. या तारखेला आतापर्यंत ग्रीन याच्या आधी फक्त 8 खेळाडूच वर्ल्ड क्रिकेटमध्ये शतकीय पारी (Cameron Green Leap Day Century) खेळण्यास यशस्वी झाले आहेत. ग्रीन आता या खास क्लबचा भाग बनला आहे.
29 फेब्रुवारीचा इतिहास
29 फेब्रुवारी रोजी क्रिकेटच्या जगातील पहिल्या शतकीय इनिंग्स जिम क्रिस्टी आणि ब्रूल मिचेल यांनी खेळल्या होत्या. त्यानंतर 1936 मध्ये जॅक फिनग्लेटन यांनी 29 फेब्रुवारीला शतक झळकवले. 1988 मध्ये मार्क ग्रेटबेच यांनी परत टेस्ट क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली. 2000 मध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू युनिस खान यांनीही 29 फेब्रुवारी रोजी शतक केले, तर 2008 मध्ये ग्रीम स्मिथ आणि नील मॅकेंझी यांनी चट्टोग्राम टेस्ट मॅचमध्ये 29 फेब्रुवारी रोजी फलंदाजी करताना शतकीय पारी खेळली.
दरम्यान, वेलिंग्टन टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मॅट हेनरीसमोर हात टेकले होते. ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्या दिवशी 9 विकेट्स गमावून 279 धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हे चारी मुंड्या चीत झाले होते. ओ रुर्की आणि स्कॉट कुग्लेजिन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत, तर रचिन रविंद्र याने सुद्धा 1 विकेट घेतली.