World Cup मध्ये अचानक नव्या संघाची एन्ट्री, खेळाडूच्या वादळी शतकाने बदललं समीकरण!
ICC Men`s T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅनडा संघाची (Canada Cricket Team) एन्ट्री झाली आहे. कॅनडाला स्थान मिळवून देण्यात मॅथ्यू स्पर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Canada Qualified for ICC T20 World Cup : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्ड कपला आता धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) क्वालिफायर सामन्यांना देखील सुरूवात झालीये. अशातच आता ओमानची राजधानी अल अमीरात येथील क्वालिफायर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅनडा आणि फिलिपाइन्स यांच्यात सामना झाला. कॅनडाने हा सामना 118 धावांनी जिंकला. या विजयासह कॅनडाने आता आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक (Canada Qualified T20 CWC) स्पर्धेत प्रवेश केला आहे.
कॅनडाचा संघ प्रथमच ICC T-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यात यशस्वी झालाय. मॅथ्यू स्पर्सने कॅनडाला आयसीसी टी-20 विश्वचषकात स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅनडासाठी त्याने शानदार फलंदाजी केली. मॅथ्यू स्पर्सने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावल्याने कॅनडाचा संघ थेट आता क्वालिफाय झालाय. फिलिपाइन्सविरुद्धच्या सामन्यात कॅनडाकडून शानदार फलंदाजी करताना मॅथ्यू स्पर्सने शतक झळकावलं. मॅथ्यू स्पर्सचा हा टी-20 पदार्पणाचा सामना होता.
मॅथ्यू स्पर्स याने 68 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्यावेळी मॅथ्यू स्पर्सने आपल्या खेळीत 14 फोर आणि 3 शानदार सिक्स खेचले. त्यामुळे क्रिडा विश्वात सध्या फक्त मॅथ्यू स्पर्स याची चर्चा सुरू आहे. मॅथ्यू स्पर्स याच्या शतकाच्या जोरावर कॅनडाने पहिल्या डावात 216 धावा उभ्या केल्या होत्या. त्यामुळे त्यांना 118 धावांनी मोठा विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, तुम्हाला माहितीये का? टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4 फलंदाज आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात शतके झळकावली आहेत. या 4 खेळाडूंपैकी 2 खेळाडू कॅनडाच्या संघातील आहेत. त्यात आला मॅथ्यू स्पर्स याचा देखील समावेश झालाय. मॅथ्यू स्पर्सच्या आधी 2019 मध्ये कॅनडाच्या रविंदरपाल सिंगने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. रविंदरपाल सिंगने 101 धावांची खेळी केली होती.