W,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम
IND vs Aus 1st Test Perth Jasprit Bumrah: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेऊन कांगारू फलंदाजांना उद्ध्वस्त केले.
Jasprit Bumrah 5 world records registered: भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने कांगारू फलंदाजांना उद्ध्वस्त केले. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत 5 विकेट घेतल्या आहेत. बुमराह हा गोलंदाज आपल्या किलर बॉलिंगने कोणताही सामना फिरवण्यात माहीर आहे. 5 विकेट घेऊन जसप्रीत बुमराहच्या नावावर 5 मोठे जागतिक विक्रम झाले आहते.
मालिका जिंकणारा गोलंदाज
जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्याची कसोटी क्रिकेटमधील त्याची ही 11वी वेळ आहे. जसप्रीत बुमराहला जागतिक क्रिकेटमध्ये मालिका जिंकणारा गोलंदाज म्हटले जाते. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात आतापर्यंत 13 षटके टाकली आहेत आणि 23 धावांत 5 बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 41 कसोटी सामन्यांच्या 78 डावांमध्ये भारताकडून 178 बळी घेतले आहेत. या काळात जसप्रीत बुमराहने 11 वेळा डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.
हे ही वाचा: 2 खेळाडूंवर बंदी, 3 जणांवर टाकती तलवार; IPL 2025 च्या लिलावापूर्वी BCCI ची मोठी कारवाई
जसप्रीत बुमराहने कोणाला केले बाद?
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने नॅथन मॅकस्विनी (10), उस्मान ख्वाजा (8), स्टीव्ह स्मिथ (0), पॅट कमिन्स (3) आणि ॲलेक्स कॅरी (21) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हे ही वाचा: 'हा' विश्वविजेता खेळाडू करतोय मिया खलिफाला डेट? स्टारने स्वतःच केला खुलासा
केले 5 मोठे जागतिक विक्रम नावावर
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया टीमच्या पाच खेळाडूंच्या विकेट घेत एक-दोन नव्हे तर अनेक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. त्यानंतर क्रिकेट जगतात त्याचे खूप कौतुक होत आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा भारताचा पाचवा कर्णधार ठरला आहे. पर्थमध्ये 'पंजा' घेतल्यानंतर त्यांचे नावही विशेष यादीत नोंदवले गेले आहे. इतकेच नाही तर बुमराह परदेशी भूमीवर कसोटी खेळताना पाच बळी घेणारा संयुक्तपणे भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय सेना देशांमध्ये खेळताना बुमराह आशियाई देशांमधून सर्वोत्तम कसोटी गोलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत पहिला आला आहे.