मुंबई : श्रीलंका विरूद्ध भारत यांच्यातील दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. यावेळी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 252 रन्स केले. तर श्रीलंकेच्या खेळाडूंचा पहिला डाव 86 रन्सवर 6 विकेट असा सुरु आहे. दरम्यान टीम इंडिया फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला मोठा फटका बसला. रोहितच्या एका चुकीमुळे भारताला पहिला विकेट गमवावा लागला.


कर्णधार रोहितमुळे टीमचं नुकसान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला मयंक अग्रवालच्या रूपात पहिला धक्का बसला. मात्र या विकेटमागे मयंकची कोणतीही चूक नव्हती. तर यासाठी स्वतः कर्णधार रोहित शर्मा जबाबदार होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये मयंक अग्रवाल रन आऊट झाल्याने पवेलियनमध्ये परतला.


श्रीलंकेकडून विश्वा फर्नांडो गोलंदाजी करत असताना त्याचा बॉल मयंकच्या पॅडवर जाऊन लागला. त्यावेळी श्रीलंकेच्या टीमने अपील केलं. दरम्यान या अपीलवर अंपायरने नकार दिला. याचा फायदा घेत मयंक आणि रोहित रन काढण्यासाठी धावले. यावेळी दोघंही फलंदाज क्रिज सोडून धावले. मात्र याचवेळी रोहितने पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेच्या टीमने मयंकला रन आऊट केलं.


नो बॉलवर मिळाली विकेट


महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंका टीमला मयंकची विकेट नो बॉलवर मिळाली. मात्र मयंक रन आऊट झाला त्यामुळे नो बॉलवर त्याला आऊट देण्यात आलं. दरम्यान या घटनेनंतर रोहित शर्मा देखील नाखूश झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर रोहितही अवघ्या 15 रन्सवर आऊट झाला.