IND vs SA: आऊट झाल्याने विराटवर शेरेबाजी, चीकूनेही दाखवली खुन्नस
इथे सुरू असलेल्या तिस-या सीरिजच्या चौथ्या दिवशी चांगलाच खेळ रंगला. हा सामना दोघांसाठीही महत्वाचा आहे.
सेंचुरियन : इथे सुरू असलेल्या तिस-या सीरिजच्या चौथ्या दिवशी चांगलाच खेळ रंगला. हा सामना दोघांसाठीही महत्वाचा आहे. सीरिजमध्ये १-० ने पुढे असलेला संघ साऊथ आफ्रिका विजयी होऊ शकतो तर टीम इंडिया सीरिजमध्ये राहण्यासाठी संघर्ष करत आहे.
टीम इंडियाला झटके
विजयासाठी २८७ चं टार्गेटचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाला दोन झटके बसले. आधे मुरली विजय ११च्या स्कोरवर आऊट झाला आणि नंतर १६च्या स्कोरवर केएल राहुल आऊट झाला. अशात सगळी जबाबदारी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली याच्यावर आली. कोहलीने पहिल्या इनिंगमध्ये शानदार शतक(१५३) लगावलं होतं.
विराटची विकेट होती गरजेची
अशातच दक्षिण आफ्रिका टीमला कोणत्याही परिस्थीतीत विराटची विकेट घ्यायची होती. कारण विजय-पराभवाच्या मधली तो एक भींत होता. आपल्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर राहुलला रन आऊट करणारा लुंगी नगिदीने तिस-या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर विराटची विकेट घेतली. कोहलीने DRS घेतला पण तो वाचू शकला नाही.
...आणि विराट संतापला
पाच रन्सच्या खाजगी स्कोरवर आऊट होऊन विराट कोहली परत जात असताना साऊथ आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी त्याच्यावर शेरेबाजी केली. विराटने ती ऎकली. त्यामुळे संतापलेला विराट काही वेळ तिथेच उभा राहिला आणि खेळाडूंच्या त्या घोळक्याकडे बघू लागला. नंतर काहीतरी पुटपुटत तो पॅव्हेलिययमध्ये परत आला.