नवी दिल्ली : WWE पाहण्यातली मजा आपण सगळेच जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत जगभरात WWEचे चाहते आहेत. पण, आपल्याला पाहताना वाटते तितके WWE खेळणे सोपे काम नाही. रविवारी झालेल्या No Mercy सामन्यात असंख्य प्रेक्षकांनी हा अनुभव घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WWE नो मर्सीवर रॉ टॅग टायटल सामना शेमस आणि सेसरो विरूद्ध डीन अॅब्रोस आणि सेंथ रॉलिंस यांच्यात झाला. या सामन्यात स्टार खेळाडू आपला दात तोडून बसला. सामन्याच्या सुरूवातीलाच शेमस आणि सेसरो यांनी अॅब्रोस आणि रॉलिंसला जोरदार टक्कर दिली. 



अॅब्रोसने आपली शानदार खेळी दाखवत सेसरोला अक्षरश: रिंगमध्ये रांगायला लावले. दरम्यान, रॉलिंसने त्याच्या तोंडावर असा काही ठोसा मारला की, ज्यामुळे सेसोरोला स्वत:ला सावरने कठीण गेले.



दरम्यान, शेमसने सामन्याच्या शेवटापर्यंत आपला संघर्ष कायम राखला. पण, अॅंब्रोसने त्याला हरवले. अॅब्रोस आणि रॉलिंसने हा सामना तर खिशात टाकला. पण, सेसरो साठी हा सामना मोठा वेदनादाई ठरला. कारण, त्याने सामना तर गमावलाच पण सामन्यासोबत आपले दातही गमावले. सामना हारल्यावर सेसोरोने आपल्या तुटलेल्या दातासह इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला.