मुंबई : टीम इंडियाचा स्टार बॉलर युझवेंद्र चहलचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. चहल एकदिवसीय आणि टी-20 मध्ये भारताचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्याला संघात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. असे काही लोक आहेत जे यासाठी त्यांची पत्नी धनश्री वर्माला ट्रोल करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता धनश्रीला केवळ चहलच नव्हे तर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनाही संघात स्थान न मिळाल्याने ट्रोल केले जात आहे.



खरं तर, जेव्हा युझवेंद्र चहल बाहेर होता, तेव्हा लोकांनी धनश्रीच्या पोस्टवर असभ्य टीका केल्या आणि तिला यासाठी जबाबदार धरले. धनश्रीने तिच्या आईसोबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या पोस्टवर, लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्यासोबत नाचणाऱ्यांना संघातून बाहेर केलं जातं अशी टीका केली जावू लागली.



काही दिवसांपूर्वी शिखर धवन धनश्री वर्मासोबत भांगडा करताना दिसला होता. एवढेच नाही तर श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा यांनी ही एकत्र जबरदस्त डान्स स्टेप्स केल्या होत्या.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)


युझवेंद्र चहल व्यतिरिक्त, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनाही टी-20 विश्वचषकाच्या 15 सदस्यीय संघात संधी देण्यात आलेली नाही. अय्यरचा स्टँडबाय प्लेयरमध्ये समावेश करण्यात आला आहे.


चहल-धनश्रीचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न


क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे एक अतिशय लोकप्रिय जोडपे आहे. तो अनेकदा त्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. युझवेंद्र चहल आणि धनश्री यांचे गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले.