Champion Trophy 2025 : पाकिस्तानसमोर ICC ने टेकले गुडघे? बीसीसीआयची पंचाईत; टीम इंडिया खेळणार की नाही?
ICC Champions Trophy 2025 Schedule : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट बोर्डामध्ये (BCCI vs PCB) वाद सुरू असतानाच आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तारखा समोर आल्या आहेत.
ICC Champions Trophy : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याचं कौतूक संपूर्ण जगाला असतं. कारण हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ फक्त आयसीसी ट्रॉफीमध्ये भिडतात. दोन्ही संघ द्विपक्षिय मालिका किंवा इतर सीरिज खेळत नाहीत. त्यामुळे दोन्ही संघाचा सामना पाहणं एकप्रकारे पर्वणीच असते. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) भारत आणि पाकिस्तान आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) आमने सामने येऊ शकते. परंतू याच चॅम्पियन ट्रॉफीच्या नियोजनावरून वाद निर्माण झाला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व सामना पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. मात्र, पाकिस्तानमध्ये टीम इंडिया खेळणं शक्यच नाही. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं आहे. त्यामुळे आता आयोजनावरून बीसीसीआय आणि पीसीबी (BCCI vs PCB) पुन्हा आमने सामने आलेत. अशातच आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात खेळवली जाणार असल्याची माहिती समोर आलीये. आयसीसीचे अधिकारी पाकिस्तानच्या स्टेडियमची पाहणी करत आहेत. तर तारीख देखील निश्चित झालीये.
क्रिकबझच्या अहवालानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान केलं जाईल. बीसीसीआयने आयसीसीला आपलं म्हणणं सांगितलं असलं तरी देखील आयसीसीने पाकिस्तानसमोर गुडघे टेकवलेत का? असा सवाल विचारला जातोय. आयसीसीच्या या निर्णयामुळे आता बीसीसीआयची कोंडी झाल्याचं दिसून येतंय. अशातच टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार की नाही? यावर बीसीसीआय गंभीर निर्णय घेऊ शकतं.
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.