चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगचं टीम इंडियाकडून जंगी सेलिब्रेशन; पाहा Video
Team India Celebration Video : दिल्लीपासून गल्लीपर्यंत फटाके उडवले जात आहेत. तर दुसरीकडे आयर्लंडच्या दौऱ्यावर शेवटची मॅच खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास (Chandrayaan-3) रचताना पाहिलं आहे.
Chandrayaan-3 successful landed : चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागले होते. चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग पार पडलं आहे. 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडर चांद्रच्या उतरलं. इस्त्रोच्या अभुतपूर्व कामगिरीनंतर आता संपूर्ण जगात जल्लोष केला जात आहे. देशभरात आता ढोल नगाडे वाजवले जात आहे. अशातच आता आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने देखील खास जल्लोष केला आहे. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत फटाके उडवले जात आहेत. तर दुसरीकडे आयर्लंडच्या दौऱ्यावर शेवटची मॅच खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचताना पाहिलं आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगवेळी कॅप्टन जसप्रीत बुमराहसह अन्य खेळाडू देखील उपस्थित होते. सर्वांनी मिळून चांद्रयान-3 च्या लँडिंगवर टाळ्या वाजवत जल्लोष केला. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंडशी भिडणार आहे.
पाहा Video
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना आता खेळवला जात आहे. पहिले दोन्ही सामने जिंकल्याने आता टीम इंडियासाठी तिसरा सामना प्रयोगात्मक असेल. त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पाहणं मह्त्तवाचं आहे.
दरम्यान, भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरलंय, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय, त्यामुळे आता जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.