दुबई : टी-20 विश्वचषक 2021 ची भारतासाठी सुरुवात पराभवाने झाली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. रविवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताला एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याचा धोका संभवू शकतो. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणताही चान्स घ्यायला आवडणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 खेळाडू बदलणार


न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळलं जावू शकतं. वरुण चक्रवर्तीला संधी मिळेल का याबाबच ही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. कर्णधार विराट कोहलीचे हे निर्णय चुकीचे ठरले आणि आता संघ निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 मोठे बदल होऊ शकतात.


1. सूर्यकुमार यादवच्या जागी ईशान किशन


सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी ओझे ठरत आहे. या खेळाडूचा फ्लॉप शो बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, या खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे भारताला पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सूर्यकुमार यादवला या सामन्यात चौथ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या फलंदाजीच्या स्थानावर संधी देण्यात आली होती, मात्र तो विश्वास त्याने तोडला आणि 11 धावा करून बाद झाला. आता असे दिसते आहे की विराट कोहली कदाचित संपूर्ण T20 विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवला संधी देणार नाही. सूर्यकुमार यादवच्या जागी ईशान किशनने आपल्या वेगवान फलंदाजीने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे. जर इशान किशन खेळला तर त्याला रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी पाठवले जाऊ शकते आणि केएल राहुलला ओपनिंगमधून चौथ्या क्रमांकावर हलवले जाऊ शकते.


2. हार्दिक पंड्याच्या जागी शार्दुल ठाकूर


हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून गोलंदाजी करू शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात हार्दिक पांड्याला काही विशेष करता आले नाही. अशा स्थितीत संघाचा समतोल साधण्यासाठी शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते. शार्दुल ठाकूर चेंडू आणि बॅटने चमत्कार दाखवण्यात माहीर आहे. शार्दुल ठाकूरने आयपीएल 2021 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांचा विश्वास जिंकला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी 16 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 25.09 च्या सरासरीने आणि 8.80 च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 3/28 होती. शार्दुलच्या उपस्थितीने खालची फळी मजबूत होईल. शार्दुलच्या गेल्या 2 वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचे तर तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होता. त्याने 14 डावात 23 विकेट घेतल्या.


3. वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विन


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात गोलंदाजीत 33 धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला ब्रेक मिळू शकतो आणि आर अश्विनला संधी मिळू शकते. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बटने वरुण चक्रवर्तीची खिल्ली उडवली. बट यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'वरूण चक्रवर्ती एक मिस्ट्री बॉलर असेल, पण तो आमच्यासाठी आश्चर्यचकित नाही. पाकिस्तानच्या रस्त्यांवर प्रत्येक मुल अशी गोलंदाजी करतो.


4. भुवनेश्वर कुमारच्या जागी राहुल चहर


भुवनेश्वर कुमारच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला सामना गमावून किंमत मोजावी लागली आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची खराब कामगिरी पाहायला मिळाली, जी टीम इंडियाच्या पराभवाचे कारणही ठरली. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 3 षटकात 25 धावा दिल्या. या काळात भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या जागी राहुल चहरला पुढच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते, जो शानदार लेगस्पिनर आहे. भुवीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएल 2021 च्या 11 सामन्यात 6 विकेट घेतल्या. भुवीच्या चेंडूंवर फटकेबाजी करण्याची एकही संधी पाकिस्तानी फलंदाजांनी सोडली नाही.