MS Dhoni Retirement: एमएस धोनीने वयाच्या 41 वर्षी म्हणजेच 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानंतर देखील धोनी आयपीएल (IPL 2023) खेळतोय. मात्र, अनेक खेळाडूंनी तसेच दिग्ग्जांनी धोनीच्या निवृत्तीच्या (Ms Dhoni Retirement) संकेत दिले होते. एवढंच काय तर मागील हंगामात खुद्द धोनीने देखील निवृत्तीचे संकेत दिले होते. अशातच आता एका फोटोने चेन्नईच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादविरुद्धच्या (SRH vs CSK) सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिसदरम्यान चेन्नई संघाने सलामीवीर डेव्हन कॉनवेसह विकेटकीपिंगचा जोरदार सराव केला होता, पण त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामुळे धोनीच्या जागी आता डेव्हन कॉनवे (Devon Conway) खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. धोनी निवृत्ती घेणार असल्याने डेव्हन कॉनवेचा सराव घेतला जात आहे, असे संकेत चेन्नईने दिल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.


IPL 2023: ना विराट ना सूर्या, हरभजन म्हणतो 'हा' खेळाडू खरा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट!


धोनीला दुसऱ्या सामन्यात दुखापत (Ms Dhoni Injury) झाली होती. त्यामुळे तो आगामी सामने खेळणार की नाही? यावर् प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली असली तरी काळजी करण्यासारखे काही नाही, असं प्रशिक्षक फ्लेमिंग (CSK Coach Fleming) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.


पाहा पोस्ट - 



दरम्यान, मागील वर्षी धोनीला प्रश्न विचारण्यात आला होता. चेन्नईच्या पिवळ्या जर्सीमध्ये त्याची शेवटची वेळ असेल का?, असा सवाल धोनीला विचारण्यात आला होता. मी आयपीएल 2023 मध्ये परत येईल कारण मला चेन्नईतील त्याच्या चाहत्यांसाठी थँक्यू म्हणायचं आहे, असं धोनी म्हणाला होता. त्यामुळे गेल्या हंगामापासून जोरदार चर्चा सुरू आहे.