मुंबई : देशभरात आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. अवघ्या काही दिवसांत अंतिम सामना पार पडेल आणि आयपीएल संपणार आहे. मात्र त्यानंतर काय असा अनेक प्रश्न सध्या टीम इंडियामध्ये सामील नसलेल्या अनेक खेळाडूंना पडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू, चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचे नाव सुद्धा येते. मात्र धोनीने रोजगारासाठी आपली दूसरी इनिंग सुरु केली आहे. यासाठी तो दक्षिणेकडे वळवला आहे. दक्षिणेकडे वळून नेमका तो काय करणार आहे ? तसेच त्याचा नवीन रोजगार काय असणार आहे ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. या प्रश्नांचीच उत्तरे या बातमीत मिळणार आहेत.   


महेंद्रसिंग धोनीने सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र अजूनही चेन्नईकडून सामने खेळत आहे.  चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या धोनीची फॅन फॉलोइंग तामिळनाडूमध्येही कमालीची आहे. तेथे त्याचे बरेच चाहते आहेत आणि लोक त्याला प्रेमाने थला म्हणतात.


महेंद्रसिंग धोनीने केवळ तामिळ चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठीची तयारीही पूर्ण झाली असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. मात्र तो काही अॅक्टींग वगैरे करणार नाही आहे, पण निर्माता म्हणून चित्रपट व्यवसायात उतरण्याचे त्याने मनाशी ठरवले आहे.


नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार 


अभिनेत्री नयनताराही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तिने शाहरुख खानसोबत हा चित्रपट साईन केल्याचे वृत्त आहे, मात्र त्याचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी नयनताराने साऊथमध्ये खूप काम केले आहे. तिने रजनीकांतसोबत दरबारसारखे हिट चित्रपट दिले आहेत. धोनीचा चित्रपट लवकरच सुरू होणार आहे.