दीपक चहरनंतर चेन्नईचा `हा` खेळाडू चढला बोहल्यावर, लग्नाचा Video आला समोर
चेन्नईचा आणखीण एक खेळाडू आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. या खेळाडूच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत.
मुंबई : भारतीय गोलंदाज आणि चेन्नई सुपरकिग्जचा खेळाडू दीपक चहर नुकताच काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला होता.य़ा खेळाडूनंतर चेन्नईचा आणखीण एक खेळाडू आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. या खेळाडूच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार खेळाडू सी. हरी निशांत लग्नबंधनात अडकलाय. निशांतने गुरुवारी (9 जून) रोजी अनुसोबत लग्न केले. CSK ने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करून निशांतचे अभिनंदन केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला 'हरीचे लग्न झाले आहे! आम्ही तुम्हाला सुपर कपल म्हणून संबोधतो, असे कॅप्शन लिहले होते.
निशांतची कामगिरी
25 वर्षीय हरी निशांतने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2020-21 मध्ये चांगली कामगिरी केली होती. निशांतने त्या स्पर्धेत 41 च्या सरासरीने 246 धावा केल्या, त्यात अंतिम सामन्यातील 35 धावांचा समावेश होता. निशांतने त्याचा बालपणीचा मित्र आणि सीएसकेचा खेळाडू एन जगदीसनच्या वरच्या क्रमाने चमकदार फलंदाजी केली. जगदीसन हा त्या हंगामातील स्पर्धेत सर्वाधिक (364 धावा) करणारा खेळाडू होता. निशांतने 2019-20 च्या हंगामात तामिळनाडूसाठी प्रथम श्रेणी सामना देखील खेळला परंतु तेथे तो प्रभाव पाडू शकला नाही.
20 लाखाला विकत घेतले
हरी निशांतला चेन्नई सुपर किंग्सने 2021 च्या मिनी-लिलावात मूळ किमतीत खरेदी केले होते, परंतु तो संघ व्यवस्थापनाला प्रभावित करण्यात अपयशी ठरला. हरी निशांतला पुन्हा एकदा CSK ने IPL 2022 च्या मेगा लिलावात 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले, पण या मोसमातही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे निशांतने अद्याप इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु तो तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळतो.