IND vs WI 2023: नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आलाय. पुजाराच्या जागी युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयवर (BCCI) मोठ्या प्रमाणात टीका देखील होताना दिसत आहे. अशातच आता अनेक दिग्ग्जांनी पुजाराची साथ देत त्याला सोशल मीडियावर पाठिंबा देण्यास सुरूवात केलीये. अशातच आता टीम इंडियामधून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या कसोटी संघातून वगळल्याच्या एका दिवसानंतर, पुजाराने अखेर सोशल मीडियावर आपलं मौन तोडलंय. पुन्हा एकदा कठोर परिश्रम सुरू ठेवण्यास आणि संघात पुन्हा स्थान मिळविण्यास इच्छुक असल्याचं पुजाराच्या या पोस्टमधून दिसून येतंय. टीम इंडियात जागा न मिळाल्याने आता दुलीप ट्रॉफी 2023 च्या पश्चिम विभागाच्या संघात पुजाराचा समावेश करण्यात आलाय. 35 वर्षाच्या पुजारा दुलीप ट्रॉफीची (Duleep Trophy) तयारी करताना दिसतोय.


फलंदाजीच्या सरावाच्या व्हिडिओसह, चेतेश्वर पुजाराने दोन इमोजी शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचं खेळावरील प्रेम दिसून येतंय. त्यामुळे आता थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय, असं म्हणताना पुजारा दिसतोय.  पुजाराने तीन वर्षांपासून धावा केल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुजाराच्या लयीत फार बदल झाले आहेत. त्यामुळे पुजारा आता आगामी सामने खेळणार की नाही? असा सवाल आता विचारला जातोय.


पाहा ट्विट -



दरम्यान, पुजारा (Cheteshwar Pujara) मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. दुलीप करंडक संघ जाहीर झाल्यानंतर तो नेटमध्ये कठोर परिश्रम घेत आहे. पुजारा गेले अनेक वर्षे देशासाठी खेळला असून त्याच्या पुनरागमनावर चिंता व्यक्त करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया पुजाराच्या वडिलांनी (Cheteshwar Pujara father) दिली आहे. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी देखील पुजाराची पाठराखण केली आहे. पुजारा हा गुणी खेळाडू असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यावेळी त्यांनी विराट आणि रोहितवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.


वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.