राजकोट : भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. क्रिकेटमध्ये बहुतेकवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले विक्रमच लक्षात राहतात, पण पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकविरुद्धच्या मॅचमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने २४८ रनची खेळी केली. कर्नाटकविरुद्ध शतक करताच पुजारा तेंडुलकर आणि द्रविडच्या पंगतीत जाऊन बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजाराचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे ५०वं शतक आहे. याआधी सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी हा विक्रम केला आहे. सचिन आणि गावसकर यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८१ शतकं आहेत. तर द्रविडने ६८ शतकं केली आहेत. पुजाराशिवाय एलिस्टर कूक (६५ शतकं), वसीम जाफर (५७ शतकं), हाशीम आमला(५२ शतकं) यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त शतकं केली आहेत. 


विराट कोहलीच्या नावावर प्रथम श्रेणीमध्ये ३४ आणि अजिंक्य रहाणेच्या नावावर ३२ शतकं आहेत. सौराष्ट्रने पहिल्या इनिंगमध्ये ५८१/७ या स्कोअरवर डाव घोषित केला.