नवी दिल्ली : साऊथ आफ्रिकेत टीम इंडियाचा भलेही पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला असेल. पण केपटाऊनच्या न्यूलॅंडमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. तो या दौ-यात सर्वात चांगलं प्रदर्शन करत आहे.


हार्दिकचा जबरदस्त खेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची ७वी विकेट गेली त्यावेळी टीमचा स्कोर ९२ रन्स होता. टीम इंडिया मोठा स्कोर उभारू शकणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने टीम इंडियाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढले. दोघांनी ८व्या विकेटसाठी ९९ रन्स काढले.


हार्दिकचा टोला



यादरम्यान, दोघांमध्ये पिचवर काही बातचीत सुरू होती. दोघांच्या या संवादामुळे प्रेक्षकांना चांगलाच आनंद मिळाला. पिचवर भुवनेश्वर नुकताच आला होता. पांड्या ३३ रन्सच्या स्कोरवर आणि टीमचा स्कोर ७ विकेटवर १०९ रन्स होता. मोर्ने मोर्कल ओव्हर टाकत होता. त्याचा एक बॉल पांड्याच्या बॅट जवळून गेला. त्यानंतर पांड्याने भुवनेश्वरकडे पाहून ‘एक दू क्या’ असं म्हणाला. 


भुवी पडला प्रश्नात



हे तसं जास्त स्पष्ट ऎकायला आलं नाही. पण कॉमेंट्री करत असलेले हर्षा भोगले यांनी ते पकडलं. त्यांनी ते लगेच सर्वांना ऎकवलं. त्यासोबतच दोघांचा हा संवाद तेव्हा झाला जेव्हा डेल स्टेन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. भुवी हार्दिकला म्हणाला, ‘इसका देख लियो, मुझे तो समझ नहीं आ रहा क्या हो रहा हैं’.