मुंबई : महिला भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चोल ट्रोएननं वादळी खेळी केली आहे. महिलाच नाही तर पुरुष खेळाडूंचं रेकॉर्ड चोलनं मोडलं आहे. ट्रोएननं ७ बॉल्समध्ये ३२ रन्सची खेळी केली. यामध्ये २ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. या वादळी खेळीमध्ये ट्रोएनचा स्ट्राईक रेट होता तब्बल ४५७.१


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरामध्ये या स्ट्राईक रेटनं २५ पेक्षा जास्त रन्स कोणत्याच खेळाडूनं कोणत्याही फॉरमॅटमध्ये करता आलेले नाहीत. हे रेकॉर्ड केल्यानंतरही भारताविरुद्धच्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला.


ट्रोएनच्या या रेकॉर्डआधी दक्षिण आफ्रिकेच्याच एंडीले फेहलुकवायोच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. भारताविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये फेहलुकवायोनं ४६० च्या स्ट्राईक रेटनं २३ रन्स केले होते. १७४ रन्सवर ५ विकेट पडल्यावर फेहलुकवायो मैदानात आला आणि त्यानं ५ बॉलमध्ये २३ रन्स केल्या. यामध्ये ३ सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. याआधी ५ बॉलमध्ये या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करण्याचं रेकॉर्ड कोणाच्याच नावावर नव्हतं. 


वनडेमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेले पुरुष बॅट्समन 


खेळाडू  रन बॉल फोर सिक्स स्ट्राईक रेट
फेहलुकवायो २३ ४६०
जे फ्रँकलिन ३१ ३८७
नॅथन मॅक्क्युलम ३२  ३  ३५५
एबी डिव्हिलयर्स १४९ ४४ १६ ३३८
आंद्रे रसेल ४२ १३ ३२३