हातात दगडाऐवजी बॅट - बॉल घ्या - मोहम्मद कैफ
IPL 2018 चं ऑक्शन नुकतंच पार पडलं.
मुंबई: IPL 2018 चं ऑक्शन नुकतंच पार पडलं.
या ऑक्शनमध्ये काही खेळाडूंना कोट्यावधीत खरेदी केलं तर काहींच्या परदी निराशाच पडली. मात्र असं सगळं असाताना जम्मू काश्मिरच्या एका गावात वेगळाच आनंद साजरा करण्यात आला.
याला कारण असं की या गावातील मंझुर दर या खेळाडूला किंग्स इलेव्हन पंजाबने 20 लाखांची बोली लावत संघात सामावून घेतलं. 24 वर्षीय मंझुर दरला संघात समाविष्ट केल्यानंतर गावकऱ्यांनी नाचत आपला आनंद व्यक्त केला. गावकऱ्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर, भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने काश्मिरी युवकांना भावनिक आव्हान केलं आहे.
हातात दगड आणि बंदूक घेण्याऐवजी बॅट-बॉल घेतलं तर परिस्थिती कशी बदलू शकते आणि काश्मिर अजुन किती सुंदर दिसू शकतं याचं उदाहरण मंझुरने दाखवून दिलं आहे. मंझुर हा आयपीएलमध्ये खेळणारा दुसरा काश्मिरी युवक ठरला आहे.