पोर्ट ऑफ स्पेन : युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असणाऱ्या क्रिस गेलने त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही आपल्या नावाला साजेशीच खेळी केली. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये गेलने ४१ बॉलमध्ये ७२ रन केले. यामध्ये ८ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. माघारी परतताना संपूर्ण भारतीय टीमने गेलला शुभेच्छा दिल्या. तर वेस्ट इंडिजच्या टीमनेही गेलचं टाळ्यांच्या कडकडाटात पॅव्हेलियनमध्ये स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजकडून गेलने ३०१ वनडे मॅच खेळल्या. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येच गेलने ब्रायन लाराचा विक्रम मोडला. दुसऱ्या वनडेमध्ये गेल वनडेमध्ये वेस्ट इंडिजकडून वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी ३९ वर्षांचा क्रिस गेल जगातल्या टी-२० लीगमध्ये मात्र खेळताना दिसणार आहे. १९९९ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या क्रिस गेलने क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले.


१ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा क्रिस गेल हा पहिला खेळाडू होता.


२ टेस्टमध्ये त्रिशतक, वनडेमध्ये द्विशतक आणि टी-२०मध्ये शतक करणारा गेल एकमेव खेळाडू आहे.


३ अंडर १९ वर्ल्ड कप, वर्ल्ड टी-२०, क्रिकेट वर्ल्ड कप (५० ओव्हर), चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप क्वालिफायर मॅचमध्ये शतकं करणारा गेल हा एकमेव खेळाडू आहे.


४ टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा गेल पहिला खेळाडू होता.


५ टी-२० वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं करणारा गेल पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.


६ क्रिस गेल टी-२० क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटपर्यंत आऊट न होणारा पहिला खेळाडू आहे.


७ टेस्ट आणि टी-२० क्रिकेट मॅचमध्ये शेवटपर्यंत आऊट न होणारा ओपनर क्रिस गेल आहे.


८ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रनचा (७९१) विक्रमही क्रिस गेलच्या नावावर आहे.


९ एका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन (४७४) गेलच्याच नावावर आहेत.


१० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स (५२०) मारण्याचा विक्रम गेलचा आहे.


११ टेस्ट क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये ६ फोर मारण्याचं रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे.


१२ टेस्ट मॅचच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारणारा गेल हा पहिला खेळाडू आहे.


१३ वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स (४०) मारण्याचा विक्रम गेलचा आहे.


१४ गेलच्या नावावर द्विपक्षीय वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक सिक्स (३९) मारण्याचा विक्रम आहे. (इंग्लंडविरुद्ध)


१५ डेवोन स्मिथसोबत टी-२० क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप (१४५ रन) क्रिस गेलने केली आहे.